जलविद्युत क्षेत्रात योगदान देणारी 'सीडब्ल्यूपीआरएस'
पुणे : पाणी आणि जलविद्युत क्षेत्रात भरीव काम करणारी देशातील महत्त्वाची संस्था म्हणून 'सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन' म्हणजेच 'सीडब्ल्यूपीआरएस'ला ओळखले जाते. पाण्याचे नियोजन, सिंचन, पूर नियंत्रण या देशासाठी महत्त्वाच्या विषयांमध्ये ही संस्था भरीवयोगदान देत आहे. संस्थेबाबत मुख्य प्रशासकीय अधिकारी राजेंद्र आसवले यांनी माहिती दिली. आसवले म्हणाले, 'सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन खडकवासला येथे आहे. जल आणि जल अभियांत्रिकी या क्षेत्रांत या संस्थेने गेली १०० वर्षे भरीव योगदान दिले आहे. १९१६मध्ये तत्कालीन बॉम्बे प्रेसिडन्सीतर्फे स्पेशल इरिगेशन सेल या नावाने संस्थेचा जन्म झाला. त्या वेळी शेतीशी संबंधित सिंचन व्यवस्थेत बदल घडविण्याच्या हेतूने संस्थेची स्थापना झाली. साधारणत: १९२५पासून संस्थेचे कामकाज खडकवासला येथून सुरू झाले. त्यानंतर १९३६मध्ये संस्थेतर्फे सिंचनासह पूरनियंत्रण आदी क्षेत्रांतही काम हाती घेण्यात आले.' [Readmore]






























































































No comments:
Post a Comment